गीत रामायणा वरील विवेचन - 38 - हीच ती रामाची स्वामिनी

  • 1.3k
  • 393

जांबुवंताने हनुमानाच्या शक्तीचे वर्णन केल्यावर हनुमानाचे बाहू स्फुरण पाऊ लागले. बघता बघता हनुमानाने विराट रूप धारण केले. आणि महेंद्र पर्वतावरून त्याने लंकेकडे उड्डाण केले. तो महाकाय समुद्र ओलांडताना मध्येत एका मगरीच्या रूपातील राक्षसीने त्यांना अडविले. परंतु आपल्या बुद्धी चातुर्याने हनुमान तिथून सुटले आणि पुढचा प्रवास करू लागले. पाहता पाहता हनुमान लंकेच्या द्वारापर्यंत पोचले. तिथे सर्वत्र अक्राळ विक्राळ राक्षसांचा पहारा होता. कुठूनही जायला जागा नव्हती तेव्हा हनुमानाने सूक्ष्म रूप धारण करून राक्षसांची नजर चुकवून लंकेत प्रवेश केला. संपूर्ण ती अजस्त्र लंका हनुमानाने नजरेखालून घातली. रावणाच्या अंतःपुरात पण जाऊन पाहिले पण सीता देवी कुठेच नव्हत्या. मग हनुमान अशोक वाटीकेत एका उंच वृक्षावर