गीत रामायणा वरील विवेचन - 40 - मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

  • 2.5k
  • 912

देवी सीतांनी रावणाला असे बजावल्यावर रावण म्हणाला,"ठीक आहे सीते सध्या तू काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तुझा तुझ्यापतीवरचा विश्वास लवकरच खोटा ठरेल तरी मी तुला एका महिन्याची मुदत देतो. मी म्हंटले त्यावर विचार कर आणि स्वमर्जीने माझी पत्नी होण्यास तयार हो.",असे म्हणून रावण आपल्या राजप्रासादात निघून गेला.सीता देवींपुढे जाण्याची आता हीच योग्य वेळ आहे हे हनुमंताने ओळखले व त्यांनी हळू आवाजात राक्षसिनींना न ऐकू जाईल पण सीता देवींना ऐकू जाईल ह्या पद्धतीने राम स्तुती म्हणणं सुरू केली. ती ऐकताच चकित होऊन देवी जानकी नि इकडे तिकडे बघितलं तेव्हा झाडावरून हनुमंताने रामांनी दिलेली अंगठी जानकी देवींच्या ओंजळीत टाकली. ती बघून जानकी