गीत रामायणा वरील विवेचन - 44 - सुग्रिवा हे साहस असले

  • 825
  • 270

रावण पुन्हा देवी सीतेकडून अपयश घेऊन आपल्या प्रासादात निघून जातो तो गेल्यावर त्रिजटा नामक एक राक्षसीण दुःखाने व्याकुळ झालेल्या सीता देवींना श्रीराम सुखरूप असून ते शीर मायावी आहे असे सांगते ते ऐकून सीता देवींचा आनंद गगनात मावत नाही. त्या डोळे पुसतात व पुन्हा त्यांचे मन श्रीरामांची आतुरतेने वाट पाहू लागते. इकडे श्रीराम आपल्या सेनेसह समुद्रपार करून लंकेजवळ पोचले असतात. श्रीराम,लक्ष्मण,हनुमान,विभीषण व सुग्रीव लंके बाहेर असलेल्या एका पर्वतावरून लंकेचं अवलोकन करत असतात. त्याच वेळी रावण सुद्धा त्याच्या प्रासादातील उंच जागेवरून सेनेची पाहणी करीत असतो. विभीषण श्रीरामांना लंकेतील प्रत्येक जागेची बारकाईने माहिती देत असतो तेवढ्यात सुग्रीवाचे लक्ष कुठेतरी केंद्रित होते व तो