गीत रामायणा वरील विवेचन - 46 - अनुपमेय हो सुरू युद्ध राम रावणांचे

  • 903
  • 252

अंगदने रामांना रावणाचा मनोदय सांगितला त्यावरून युद्ध आता अटळ आणि अपरिहार्य आहे हे रामांना कळलं एका शुभ मुहूर्तावर युद्ध आरंभाचा शंख ध्वनी दोन्ही बाजूंनी झाला आणि राम सेना व रावण सेनेचे तुंबळ युद्ध सुरू झाले. रणांगणावर सर्वत्र बाणांचा वर्षाव होऊ लागला. सगळेजण त्वेषाने मोठमोठ्याने गर्जना करीत होते जणू सगळ्यांच्या मुखातून विद्युल्लता कडाडत होती. त्या अतिप्रचंड आवाजाने दोन्हीकडच्या सैन्यातील घोडे थय थय नाचत खिंकाळत होते त्याच्या जोडीला हत्ती सुद्धा गर्जना करीत होते. त्या आवाजातच वानर सेना व राक्षसांच्या चालण्याचे लयबद्ध आवाज मिसळले.वानर सेना दात ओठ खाऊन दैत्य सेनेवर तुटून पडत होती. दैत्य सुद्धा त्यांच्याशी बरोबरीने लढत होते. वानर उंच उड्या मारत