गीत रामायणा वरील विवेचन - 50 - लीनते,चारुते, सीते

  • 2.5k
  • 807

श्रीराम विभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास सांगतात ते ऐकून विभीषण आश्चर्याने म्हणतो,"प्रभू हे आपण सांगता आहात! ज्या रावणाने आपल्याला एवढा त्रास दिला त्याचा आपण अंत्यसंस्कार करण्यास सांगता आहात. धन्य आहात आपण!""विभीषणा वैर हे ती व्यक्ती जिवंत असेपर्यंतच असते. मृत्यूनंतर वैर संपते त्यामुळे धर्माप्रमाणे तू तुझ्या ज्येष्ठ बांधवाचे क्रियाकर्म करणे आवश्यक आहे ते तू कर.",श्रीरामविभीषण रावणाचे अंत्यसंस्कार करतो. लंकेत शोककळा पसरली असते. श्रीराम रौद्ररूप त्यागून आता सौम्य रूप धारण करतात व हनुमानास देवी सीतेला आपली विजयची व कुशलतेची वार्ता देण्यास सांगतात. हनुमान जेव्हा सीता देवींना श्रीराम विजयी झालेत अशी वार्ता देतात तेव्हा जनकनंदिनीं च्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात त्या श्रीरामांना भेटण्याची इच्छा