संयोगीता हिंदूस्थान असा देश की ज्या देशात लोभाला अधिक महत्व दिलं गेलं. हे पुरातन काळापासून अस्तीत्वात आहे. आजपर्यंत जे काही युग झाले असे हिंदूंचे ग्रंथ मांडतात. त्या ग्रंथानुसार अगदी कृतयुगापासून जर पाहिलं तर लोभानं कोणाला सोडलेलं नाही. ज्यावेळी समुद्रमंथन झालं. त्यावेळी जी वस्तूंची वाटणी झाली. त्या वाटणीतही लोभच दिसून येतो. इंद्र हा देवांचा राजा असून त्याला आपलं राजपद जावू नये असंच वाटायचं. त्यामुळं देव आणि दानवाचे युद्ध होत. त्यातच सर्व जगाची माहिती ठेवणारा नारद हा ज्याप्रमाणे देवांना माहिती द्यायचा. त्याचप्रमाणे दानवांनाही माहिती द्यायचा. पण त्याच्या मनात कपट नव्हता. परंतू जसजसा काळ बदलला आणि अमृतवाटप झालं. त्यानुसार दोघांनाही अमृताची समान वाटणी