भगवद्गीता - अध्याय ७

  • 3.3k
  • 1.7k

श्री भगवान म्हणाले पार्था ! माझ्या आश्रयाने मन माझ्यापाशी ठेवून संशय सोडून मी तुला सांगत असलेला पूर्ण योग ऐक. तुला आत्मज्ञान व प्रपंच पूर्णपणे सांगतो. हे तुला एकदा समजलं की तुला अन्य समजण्यासारखे कांही राहणार नाही. सिद्धि मिळवण्यासाठी हजारातून एखादाच प्रयत्न करतो, त्यातून एखादाच मला यथार्थाने जाणतो. धरा, जल, अग्नि, वायु, नभ, मन ,बुद्धी आणि अहंकार अशी ८ रूपांची माझी प्रकृती आहे. तिला अपरा म्हणावे. आणि दुसरी परा प्रकृती आहे ती या जगाला धारण करते व तीच जीव भूत चैतन्य आहे. या दोन्हीपासून सर्व प्राणी व जग उत्पन्न झाले आहे. मीच सर्व जगाचा आदि आणि अंत आहे. हे धनंजया, माझ्याहून