जोसेफाईन - 4

  • 6.4k
  • 4k

आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतील त्या 1002 फ्लॅटचे दार कर करत उघडले. ठसका लागत खोकलत खोकलत काहीजण फ्लॅटची एकेक खोली साफ करू लागले. सगळीकडून फ्लॅट मध्ये कुबट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटे झाले होते. संपूर्ण दिवस घालवून तो फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिऱ्हाड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होते.बरेच महिने तो फ्लॅट रिकामाच होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेले पण टिकले एकही नाही. कारण एकच जोसेफाईन!!जोसेफाईन चे अस्तित्व कोणालाही तिथे टिकू देत नव्हते.अनेकांना जोसेफाईन चे पिशाच्च त्या फ्लॅट मध्ये भटकताना दिसले होते.आता ह्या बिऱ्हाडाला काय अनुभव येणार होता काय माहित?एका शुभ मुहूर्तावर घरी पूजा