भगवद्गीता - अध्याय ११

  • 2.8k
  • 1.3k

११. विश्व़रूपदर्शन योग.अर्जुन म्हणाला ! तुम्ही मला अध्यात्माचा उपदेश केलात. त्या तुमच्या उपदेशाने माझ्यातील मोहभावना पूर्णपणे नष्ट झाली आहे. हे कमलनयना ! मी तुझ्या कडून उत्पत्ति व नाशासंबंधी विस्तारानेऐकले व तुझे अविनाशी माहात्म्य ही ऐकले. हे परमेश्वरा ! तू तुझ्या स्वरूपाविषयी सांगितलेस त्यामुळे मला तुझे ईश्र्वरी रूपाचे ऐश्र्वर्य पहाण्याची इच्छा आहे. हे प्रभू ! मला ते रूप पाहणें शक्यअसेल तर हे योगेश्व़रा ! मला तुमचे अव्यय रूप दाखवा. श्रीभगवान म्हणाले, हे पार्था ! माझी शेकडो, हजारो अशी रूपे पहा. माझे अनेक असे दिव्य आकार व वर्ण पहा. माझ्या ठायी असलेले आदित्य, मरूत, रुद्र अश्विनी व वसूंना पहा. तू पूर्वी कधी