️खरं प्रेम ️ प्रेम ते हृदयात जवळ असत ते .जे डोळ्यात दिसत ते नसतं माप ओलंडताना तिने एक छानसा उखाणा घेऊन,घरात प्रवेश केला.घराच्या सगळ्यांनी नवीन सुने च स्वागत केल. आणि उखाण्याच्या सोबत तिचं ही कौतुक केल. नात्यांच्या गोतावळ्यात तिचा नवीन दिवस कसा गेला कळलाच नाही.दुसरा दिवस उजाडला आणि आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. दोघी ही जोडीने पूजेला बसले. ,सत्यनारायण पूजा ही आटोपली. जोडीने घरातील मोठ्यांच्या आशीर्वाद घेउन संसाराला सुरुवात केली., घरातल्या. सवाष्ण बायकांनी तिची ओटी भरली. संध्याकाळी सगळे हळदी कुंकाला पण आले होते. तिचा चेहरा खूप प्रसन्न होता. आज नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती.लग्न हा सगळ्यांच्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा.रात्री उशीरा