अध्याय १३महाभूते (५), अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृति, दहा इंद्रिये, मन, इंद्रियांचे पाच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, देह व इंद्रियांचा संयोग, चेतना, धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसह क्षेत्र असे म्हणतात.( इंद्रिये- ज्ञानेंद्रिये - डोळे, कान, नाक, जिभ, त्वचा. २- कर्मैंद्रिय - वाणी, हात, पाय, उपस्थ, गुदद्वार . मन हे अतरिंद्रिय. पाच इंद्रिय विषय - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. )विनम्रता, दंभ नसणे, अहिंसा, क्षमाशीलता, सरळपणा, चित्त शुद्धि, गुरूची सेवा करणे, संयम, स्थिरता, इंद्रियांचे ठिकाणी अनासक्ती, अहंकार नसणे, तसेच जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग, यांमधील दोष ध्यानात ठेवणे, आसक्ति नसणे, पत्नी, पुत्र, घर इ. कशातही गुरफटून न राहणे, समतोल वृत्ति, इष्ट, अनिष्ट