भगवद्गीता - अध्याय १४

  • 2.3k
  • 870

भगवद्गीता -अध्याय चौदावा.गुणत्रय विभाग योगश्री भगवान म्हणाले, मी तुला पुन्हा एकदा सर्व ज्ञानातले श्रेष्ठ असे ज्ञान सांगतो जे जाणून सर्व मुनींना परम सिद्धि मिळाली. हे ज्ञान मिळवून जो आपल्या आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो माझ्यासारखे दिव्य स्वरूप प्राप्त करतो. असा‌ मनुष्य सृष्टीआरंभी न जन्म घेतो न प्रलयाच्या वेळी मरण पावतो. सर्व महद् ब्रह्म म्हणजेच सृष्टि ही माझी योनी असून मी तिथे गर्भ ठेवतो व सर्व प्राण्यांची उत्पत्ति हे अर्जुना ! त्यातूनच होते. हे कौंतैया , सर्व योनींमध्ये जे जे देह प्रकट होत असतात ती योनी म्हणजे प्रकृति असून त्या सर्वांचा पिता मी आहे. प्रकृति चे तीन गुण सत्व, रज, तम.