पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग २

  • 3.4k
  • 1.4k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )    भाग २ भाग १ वरून पुढे वाचा  .... विभावरी झोपल्यावर बराच वेळ किशोर जागा होता आणि विभावरीच्या बोलण्याचा विचार करत होता. शेवटी तो एका निष्कर्षावर आला, की विभावरीने त्याला समजून घेतलं आहे तेंव्हा, त्याला सुद्धा तिचं मन राखायला पाहिजे. उद्या पासून अभ्यास करायचा असा मनोमन निश्चय केल्यावर, मगच त्याला शांत झोप लागली. सकाळी, चहा पितांना माईंनी विचारलं, “काय ग काहीं बोलणं झालं का?” “तसं म्हंटलं तर बोलणं झालं. पण आता बघायचं की किशोर काय करतो ते, काल काही अंदाज आला नाही.” विभावरी म्हणाली. “असं गुळमुळीत काही नको. असं काहीतरी  कर की तो