पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ३

  • 2.6k
  • 1.2k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )    भाग ३ भाग २  वरून पुढे वाचा  .... तुला बँकेच्या  बॅलेन्स शीटचा अभ्यास करावा लागेल, आणि हे एक प्रचंड काम असतं. त्या साठी तू कोणीतरी चांगला CA पकड. इतरही अनेक रेशो आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल, उदाहरणार्थ डेट -इक्विटी रेशो, असेट लायबीलीटी रेशो, वगैरे. पण हे सगळं हळू हळू कर. मन लावून केल्यास, कठीण काहीच नाहीये. थोडक्यात, ऑफिसर झाल्यावर तुला बँक यशस्वी रित्या चालवायची आहे, त्याचं हे शिक्षण आहे. तू हुशार आहेस, केंव्हाच मला मागे टाकून पुढे जाशील.” – साहेब. “काय साहेब, काहीतरीच काय? तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी शिकतोय. उगाच माझी थट्टा करताय.”