पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ४

  • 2.8k
  • 1.4k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ४ भाग ३  वरून पुढे वाचा  .... काही दिवस असेच वाट पाहण्यात गेले. उत्सुकता वाढत होती, पण साहेब, निश्चिंत होते, ते म्हणाले, की मुळीच काळजी करू नकोस, निवड होणार याची मला पक्की खात्री आहे. एक दिवस संध्याकाळी विभावरी हिरमुसलं तोंड करून आली. माई एकदम धसकल्या. किशोर पण अजून आला नव्हता, विभावरी आली आणि न बोलता सोफ्यावर बसली. चेहरा खूप उतरला होता. माईंनी काळजीने विचारलं “ अग काय झालं? जरा सांगशील का?” “मला एक वर्षा साठी अमेरिकेला जावं लागणार आहे ,माई,” – विभावरी. “अग काय, सांगतेस काय? असं अचानक? अरे, देवा! मग