पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ८

  • 2.9k
  • 1.3k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ८ भाग ७  वरून पुढे वाचा  .... माधवी आता निवांत पणे खुर्चीवर बसली. आता दुपारचे पांच वाजत आले होते, आणि सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा तिच्या पोटात गेला नव्हता. तिला एकदम भुकेची जाणीव झाली. तिच्या बरोबर तिचा बँकेतला सहकारी होता, त्याने जाऊन काही तरी खायला आणलं. खाल्यावर जरा तरतरी आली. “सकाळ पासून खूप विचित्र घटना घडताहेत, खूपच दगदग झाली. तुम्ही खूप थकल्या असाल, तुम्ही घरी जाऊन आराम करता का? मी थांबतो इथे.” – सहकारी. “छे,छे. अरे, ज्या माणसाने माझ्या साठी जिवाची बाजी लावली, त्याला सोडून मी घरी जाऊ? माझ्या नवऱ्याच्या नावाला