पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ९

  • 2.6k
  • 1.2k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ९   भाग ८  वरून पुढे वाचा  .... “एक मिनिट, विभावरी, थोडं थांबतेस का? माझ्या काही ओळखी आहेत एयरलाइन्स मधे, मी बघतो तुला उद्याची फ्लाइट मिळते का?” – बॉस. “थॅंक यू सर, खरंच फार मोठी मदत होईल मला. थांबते मी.” – विभावरी. जवळ जवळ अर्धा तास बॉस फोन वर बोलत होता, मग विभावरीला म्हणाला. “तुझं काम झालं आहे. उद्याच्या फ्लाइट मधे तुला जागा मिळून जाईल. मी एक फोन नंबर देतो, त्यांना कॉनटॅक्ट कर ते तिकीटाची व्यवस्था करतील.” – बॉस.   विभावरी दुसऱ्याच दिवशी विमानात बसली. विमान सुरू झाल्यावर विभावरीने एक समाधानाचा