दोन लघुकथा

  • 3.7k
  • 1
  • 1.5k

कथा पहिली कथा मधमाश्यांची परीक्षा संपली.मुल ओरडतच घरी आली. चक्क, दफ्तरे कोपर्यात फेकत नाचू लागली. " चला, आता काही खर नाही. दिवसभर धिंगाणा घालतील मुल." आई वैतागली. एवड्यात बाबा बाहेरून आले. " बाबा, आज सायंकाळी मोरडोंगरी वर जायच..." मधु म्हणाली. " होय, जायच म्हणजे जायचच..." अजय बाबांचा हात पकडत म्हणाला. " ठिक आहे , उन्ह कमी झाल्यावर जाऊया." बाबा म्हणाले. " हुर्रे....हुर्रे...." मधु व अजय बाबांभोवती फेर धरून नाचू लागले. संध्याकाळी साडेचार वाजता ..बाबा, मधु व अजय मोरडोंगरीवर जाण्यासाठी बाहेर पडले.मधु व अजयने डोक्यावर टोप्या घातल्या होत्या.पाण्याच्या बाटल्या...दुर्बीण...काठी या वस्तू त्यांनी सोबत घेतल्या होत्या. टेकडीवर सायंकाळी अनेक पक्षी येतात. मोर