अनामिका

  • 1.3k
  • 1
  • 453

  पहिल्यांदा मला ती दिसली… रेल्वे तिकिटाच्या रांगेत...अक्षरशः कुणाशी तरी भांडत होती...म्हणूच तर माझं लक्ष गेलं....काळी सावळी पण तरतरीत नाकाची आणि मोठ्याला डोळ्यांची ... गर्दीचा गदारोळ वाढला......शेवटी तिने आपला पवित्रा मागे घेतला...आणि शांत होऊन रांगेत शेवटी जाऊन उभी राहिली...मला काही कळेना..मला वाटलं पोरगी मधेच घुसत असावी...म्हणून हे सर्व..... मी दुर्लक्ष केलं....पण का कुणास ठाऊक जाता जाता तिच्याकडे  माझं लक्ष गेलंच....तिच्या मोठ्याला डोळ्यांनी मला बंधिस्त केलं.... काय होत असं त्या डोळ्यात  कि मी इतका अडकलो… आयुष्य हे फार सरळ असत.. ते आपण जगावं तसं असत....रांगेच्या मध्ये घुसणार्या मुलीचा इतका विचार का करतोय मी ...खरं तर अशी दुसऱ्याला त्रास देणारी माणसं मला