मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६

  • 5.7k
  • 4.3k

मला स्पेस हवी पर्व १भाग ६ मागील भागात आपण बघीतलं की नेहा अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे.पुढे बघू काय होईल! "नेहा पूर्ण विचार केलास का?" "हो. तू सतत हा प्रश्न मला का विचारतो आहेस?" " कारण त्या सो कॉल्ड स्पेस साठी तू पुढचा विचार करत नाहीस असं मला वाटतंय." "तूच फक्त कोणताही निर्णय घेताना सर्वांगानी विचार करतोस असं वाटतं का?" "असं मी कधी म्हटलय?" "मग आजच का हा प्रश्न. हा प्रश्न मला तू या आठ दिवसांत तीनदा तरी विचारला असशील." "हो विचारला असेन पण आता तुझ्या किंवा माझ्या निर्णयावर एक जीव अवलंबून आहे.हे आपण दोघांनी लक्षात ठेवायला हवं म्हणून मी