मला स्पेस हवी पर्व १ - भाग १०

  • 4.9k
  • 3.3k

मला स्पेस हवी भाग १०मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जायची वेळ जवळ आली तशी ती सुधीर आणि ऋषीबरोबर खूपच कोरडी वागायला लागली. आज ती बंगलोरला जाणार आहे.बघू काय होईल.नेहाची जायची वेळ झाल्याने सगळे जेवायला बसले. नेहा गप्पं होती. सुधीरच्या आईला वाटलं आता थोड्याच वेळात आपण बंगलोरला जाणार आहे तर नेहा ऋषीबरोबर खूप गप्पा मारेल पण असं काही घडत नव्हतं. ऋषी काही तिला विचारायचा तेव्हा ती मधून मधून हं हं करत होती.नेहाच्या आवाजातील कोरडेपणा सुधीर, त्याची आई आणि बाबा यांना कळत होता पण ऋषीला कसा कळणार? शेवटी सुधीरची आई म्हणाली," ऋषी बेटा आईला बंगलोरला जायचय नं आईला जेवूदे. तूपण