मला स्पेस हवी पर्व १ - भाग १३

  • 4.8k
  • 3.4k

मला स्पेस हवी भाग १३मागील भागात आपण बघीतलं की नेहा ऋषीला लगेच फोन ठेवायला सांगते. हाॅटेलवर पोचल्यावर ऋषीचा फोन आला तर व्यवस्थीत बोलायचं असं नेहा मनाशी ठरवते.आता बघू नेहा तशी वागते का?बंगलोरला बस पोचली. नेहाने बॅगा घेतल्यानंतर त्या ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये थांबून हाॅटेलला जायला कॅब बुक केली आणि कॅबची वाट बघत तिथे येणाऱ्या बस आणि त्यातून उतरणारे प्रवासी त्यांची बाॅडी लॅंग्वेज बघत होती. त्यांचे संवाद ऐकत होती. यात वेळ कसा निघून गेला नेहाला कळलं नाही.नेहाची कॅब आली. नेहाने दोन्ही बॅगा कॅबच्या डिकीत ठेऊन कॅबमध्ये बसली आणि कॅब ड्रायव्हरला ओटीपी सांगीतला. कॅब सुरू झाली. कॅबच्या खिडकीतून बाहेर बघत नेहा बंगलोर शहर नजरेखालून