मला स्पेस हवी पर्व १ - भाग १६

  • 4.1k
  • 2.9k

मला स्पेस हवी पर्व १ भाग १६मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी बोलणार असतात पण सुधीरची मित्राच्या आत्महत्येमुळे मन:स्थिती ठीक नसते. या भागात बघू सुधीरला त्यांचे आईबाबा विचारू शकतात काबराच वेळ झाला तरी सुधीर आपलं डोकं सोफ्याला मागे टेकवून डोळे मिटून बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातून अजुनही पाणी वहात असतं. मधूनच त्याला दु:खाचा कढ आवरता येत नाही.सुधीरचे बाबा त्याच्यासमोर येऊन उभे राहतात तरीही सुधीरला त्यांची चाहूल येत नाही. बाबा एकदा सुधीरकडे बघतात एकदा त्याच्या मागे उभी असलेल्या त्याच्या आईकडे बघतात आणि मानेनीच नाही म्हणतात.आई त्यांना खुणेनेच सांगते की त्याला हलवा आणि विचारा सविस्तर काय झाले? यावर बाबा होकारार्थी