मला स्पेस हवी पर्व १ - भाग २१

  • 3.6k
  • 2.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २१मागील भागात आपण बघीतलं की नेहा ताम्हाणे साहेबांना आपली टूरप्लॅनींगबरोबर जाहिरातीमधील नव्या कल्पना सांगते. ताम्हाणे साहेबांनी संचालक मंडळामध्ये या कल्पना मांडल्या होत्या .संचालक मंडळाला त्या कल्पना आवडल्या की नाही हे आज कळेल.सकाळी नेहा ऑफीसमध्ये पोचली. दहा मिनिटातच नेहाच्या टेबलवरचा इंटरकाॅम वाजला. नेहाने फोन ऊचलला." हॅलो"नेहा मॅडम ताम्हाणे बोलतोय.""गुड मॉर्निंग सर" नेहा म्हणाली."गुड मॉर्निंग. काल संचालक मंडळासमोर मी तुमच्या कल्पना मांडल्या त्यांना आवडल्या. त्यांना आणखी डिटेल्स हवे होते. ऊद्या पुन्हा मिटींग घ्यायची हे अध्यक्षांच्या संमतीने ठरलंय. या मिटींग मध्ये फक्त तुम्ही मांडलेल्या कल्पनांवर चर्चा होणार आहे. तुम्ही व्यवस्थित तयारी करून या. होऊ शकतं तुमच्या कल्पना