मला स्पेस हवी पर्व १ - भाग २४

  • 3.5k
  • 2.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २४मागील भागात आपण बघीतलं की ऋषी नेहाशी बोलल्यावर खूप खूष असतो. आता बघू"आजोबा आज आईंशी मी खूप वेळ बोललो.""अरेवा! मग एक मुलगा खूष?""हो""आता जेवायला चलायचं का "आजीने विचारलंं."हो आजी. "तिघं जेवायला बसले.ऋषीची अखंड बडबड चालू होती.हं हं असं करत, मध्येच हसत सुधीरचे आई बाबा ऋषीची बडबड ऐकत होते पण मनातून त्यांना गलबलल्यासारखं होत होतं***थोड्यावेळाने सुधीरचा फोन आला."हॅलो""आई अग बाबा कुठे गेलेत?""कारे?""त्यांना फोन केला ऊचलला नाही.""ऋषीला झोपवतात आहे. दुपारी आजोबांनी गोष्ट सांगायची असते.""अरे हो विसरलोच.""काय काम होतं बाबांशी?""ऋषी बोलला का नेहाशी हे विचारण्यासाठी फोन केला होता.""हो बोलला. खूप खूश होता.""हं""सुधीर तू केलास का नेहाला कधी