मला स्पेस हवी पर्व १ - भाग २७

  • 3.4k
  • 2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २७मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीर भेटणार होते आता बघूसुधीर आणि नेहा भेटल्यानंतर आठ दिवस कापरासारखे उडून गेले आणि साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला.सुधीरच्या घर सुधीरचं घर आनंदाने फुलून आले. सुधीरचे मामा,मामी आज सकाळपासून त्यांच्याकडे राह्यला आले होते. सुधीरचे काका आता नाहीत पण काकू मात्र आवर्जून आल्या. सुधीर त्यांना घेऊन आला. सुधीरच्या दोन मावश्या मुंबईहून आल्या. त्यांच्याकडचे बाकी सगळे साखरपुड्याच्या दिवशी येणार आहेत.सुधीरचे मामेभाऊ आणि त्यांची फॅमिली पण ऐनवेळी येणार कारण ते पुण्यातच राहतात. मामा माईंना मात्र सुधीरच्या आईने एक दिवस आधी बोलावलं. तेवढ्याच गप्पा होतील. एकमेकांच्या भेटीने मनाला वेगळीच एनर्जी मिळते. बरोबरीने