मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३०

  • 3.2k
  • 1.8k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३०नेहा आणि सुधीरचं लग्न होऊन दोन वर्ष होत आली. या काळात नेहाची नोकरी व्यवस्थित सुरू आहे. प्रियंका तिची नणंद. तिच्याशी नेहाचं मस्त बाॅंडींग तयार झालंय. सुधीरचे आईबाबा नेहावर खूश आहेत तर नेहाचे आईबाबा सुधीरवर खूश आहेत. एकूण काय सगळं व्यवस्थित चालू आहे. आता प्रियंकासाठी स्थळ बघणं सुरू झालंय आता बघू काय होईल?"अगं ऐकलस का?""बोला"सुधीरची आई सुधीरच्या बाबांसमोर येऊन म्हणाली."मी काय म्हणतो आमचा मित्र आहेनं रमेश. तो म्हणत होता की प्रियंकाचं नाव एखाद्या वधूवरसूचक मंडळामध्ये नोंदवा. ऑनलाईन असतं ते.""प्रियंकाला आधी विचारून आधी.""प्रियंकाला काय विचारायचं ?""म्हणजे काय? लग्न तिचं करायचंय.'"आता पंचवीस वर्ष संपत आली प्रियंकाला. आणखी