मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३५

  • 2.9k
  • 1.5k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३५मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रियंकाला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला जाणार असते.बघू काय होईल.नेहा प्रियंकाच्या घरी पोचली .तिने दारावरची बेल वाजवली. लगेच कोणीतरी धावत दाराशी आल्याचं नेहाला जाणवलं. प्रियंकाने दार उघडलं . तिला बघून नेहा चकीत झाली. इतक्या जोरात प्रियंका धावत दार उघडायला आली त्यामुळे तिला चांगली धाप लागली होती. तिचा श्वासोच्छ्वास जोरात चालत होता. एवढं असूनही प्रियंकाच्या चेहे-यावर खूप आनंद दिसत होता."अगं एवढ्या जोराने का पळत आलीस दार उघडायला?""हं. मग आई किंवा बाबांनी दार उघडलं असतं. "नेहाचं प्रियंकाच्या मागे लक्ष गेलं. प्रियंकाचे सासू सासरे ऊभे होते. नेहाला बघून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद