मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३६

  • 2.7k
  • 1.6k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३६मागील भागात आपण बघीतलं की नेहा घरच्यांना समुपदेशना बद्दल सांगते. घरचे सगळे तयार होतात.लंचटाईम मध्ये नेहा रंजनाला सांगते."रंजना काल अचानक मी प्रियंकाजवळ समुपदेशनाचा विषय काढला.तिला समुपदेशन म्हणजे काय हे आधी समजावून सांगितलं नंतर समुपदेशनामुळे काय साध्या होतं हेही प्रियंकाला सांगितलं तर ती चटकन तयार झाली. मला टेन्शन आलं होतं ते दूर झालं.""चला बरं झालं अचानक विषय निघाला आणि तू समजावून सांगितलं. कधी कधी खूप तयारी करूनही विषय समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकत नाही.""खरय. मी तिला म्हटलं की तूच निरंजनला सांग. तुझी समुपदेशनासाठी तयारी आहे हे बघितल्यावर तोही चटकन तयार होईल.तर हो म्हणाली.""चला हेपण बरं