मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३७

  • 2.6k
  • 1.5k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३७मागील भागात आपण बघीतलं की निरंजन आणि सुधीरला डाॅक्टर केमोथेरपी बद्दल सांगतात."परवा प्रियंकाची केमोथेरपी आहे. ""हो. खूप त्रास होतो असं ऐकलं आहे."आई म्हणाली."आई सगळ्यांनाच खूप त्रास होतो असं नाही असं डाॅक्टर म्हणाले. पण थोडाफार होत असेलच""मला वाटतं ते पेशंटच्या प्रकृतीवर सुद्धा अवलंबून असेल."नेहा म्हणाली."हो तसं असेलच."आई म्हणाली."सुधीर त्या समुपदेशन करणा-या मॅडमची कधी वेळ घेतोय?"सुधीरच्या बाबांनी विचारलं."आज फोन यायला हवा निरंजनचा."'त्याचा फोन नाही आला तर तू कर."बाबा म्हणाले."हो मी करीन. नेहा तू त्या मॅडमचा नंबर घेतलास का?""निरंजनचा फोन येऊ दे मग मी रंजनाला सांगते. ती आपल्याला जी वेळ हवी आहे ती रंजनाला सांगू मग ती