मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४१

  • 2.7k
  • 1.5k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४१प्रियंकाचं समुपदेशन चालू होतं, केमोथेरपी पण चालू होती तिचे छंद ओळखून विद्ध्वंस मॅडम तिला ॲक्टीव्हिटीज सांगत. ध्यान आणि व्यायाम पण सुरू झाला होता.आता काय घडतंय या सगळ्यांच्या आयुष्यात बघू.प्रियंकाचं आजारपण आता तीव्र रूप धारण करू लागलं होतं. दिवसेंदिवस तिचा थकवा वाढत चालला होता. चेहरा निस्तेज वाटायला लागला होता. पुर्विसारखी कोणत्याही गोष्टीला ती चटकन प्रतिसाद देत नसे कारण तिच्या मेंदूपर्यंत विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ समजायला वेळ लागत असे.निरंजनची पण अवस्था खूप कठीण झाली होती. त्याच्या कंपनीत त्यांचं नाव चांगलं असल्याने कंपनीने प्रियंकाच्या आजारपणामुळे आणि त्याचे आईबाबा वयस्कर असल्याने वर्क फ्रॉम होमची सवलत त्याला दिली होती त्यामुळे