मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४२

  • 2.4k
  • 1.4k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४२मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकासाठी दिवसा आणि रात्री ट्रेण्ड नर्स ठेवल्या आहेत.काही महिन्यांनंतर…प्रियंकाची तब्येत आता खूपच खालावत चालली होती. तिच्या केमो चालू होत्या. पण आता सगळ्यांनाच तिच्या जगण्याला बरी कल्पना आली होती. दोन्ही केयरटेकर खूप शांतपणे प्रियंकाचं करत होत्या प्रियंकाचे होणारे हाल आता कोणालाच बघवत नव्हते पण कोणीही काहीही करू शकत नव्हतं. प्रियंकाचा कॅंन्सर हा अगदी शेवटच्या स्टेजला लक्षात येऊनही ती चार महिने खूप चांगली होती नंतर मात्र झपाट्याने तिची तब्येत खालावत गेली.जेव्हा ती चांगली होती तेव्हा काहीतरी चमत्कार होईल आणि प्रियंका खडखडीत बरी होईल अशी भाबडी आशा सगळ्यांच्या मनात होती पण तसं