मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४४

  • 2.5k
  • 1.5k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४४मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाची तब्येत सिरीयस होते.तिला दवाखान्यात ॲडमीट करतात.पुढे काय होतं बघू.प्रियंकाला ॲडमीट केल्यानंतर निरंजन सगळ्यांची वाट बघत अस्वस्थपणे आय.सी.यू. समोर येरझाऱ्या घालत होता. मधुन मधुन त्याचं लक्ष वरच्या पहिल्या मजल्यावरील मोठ्या खिडकीतून खाली दवाखान्याच्या पाय-यांकडे जात होतं. त्याचे आईबाबा, सुधीर,त्याचे आईवडील,नेहा यापैकी कोणीच येताना दिसत नव्हतं क्षणोक्षणी निरंजनचा धीर खचत चालला होता. तो हताश होऊन आणि येरझाऱ्या घालून थकल्यामुळे खुर्चीवर बसला. आपल्या ओंजळीत चेहरा लपवून अश्रू गाळू लागला. त्याचं वेळी त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने दचकून वर बघीतलं. सुधीर आला होता त्याला बघताच निरंजनच्या मनाचा बांध फुटला.“सुधीर काय होईल