मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४६

  • 2.3k
  • 1.3k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४६प्रियंका हे जग सोडून गेली त्याला आता वर्ष झालं. या वर्षभरात निरंजन ऑफीसमध्ये जायला लागला पण प्रियंकाच्या आठवणीतून पूर्ण पणे बाहेर आला नव्हता. सुधीर आता पूर्वीसारखा रोज येत नसे. निरंजनला वास्तवाची जाणिव सुधीरने करून दिली तेव्हा तो ऑफीसमध्ये जायला लागला.****त्या दिवशी निरंजनच्या बाबांनी सुधीरला निरंजनला चार समजूतीने गोष्टी सांग असं म्हणाले तेव्हा सुधीर निरंजनच्या घरी मुद्दाम निरंजनशी बोलायला आला,“निरंजन कसा आहेस?”“कसा असणार? प्रियंका शिवाय मला हे जीवन एक रखरखीत वाळवंट वाटतं. वाळवंटात मला प्रेमाची तहान लागली आहे पण… “एक दीर्घ नि: श्वास निरंजनने सोडला.“निरंजन तुला काय म्हणायचंय ते मला कळतंय. अरे प्रेमाची तहान सगळ्यांनाच