मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४७

  • 2.7k
  • 1.3k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४७प्रियंका जाऊन आता वर्ष झालं.निरंजन आता बराच सावरला होता.ऑफीसमध्ये जायला लागला होता. प्रियंकाला कॅंन्सर झाला आहे हे कळून ती हे जग सोडून गेली तेव्हा पर्यंतची दोन अडीच वर्ष दोन्ही कुटुंबांना खूप धकाधकीची गेली. यात नेहाचीपण बरीच धावपळ झाली. आता पुढे काय होणार हे बघू.नेहा ऑफीसमध्ये निघताना ऋषी तिला येऊन बिलगला.“काय रे पिल्लू? काय झालं? मी ऑफीचला जाऊ नं?”ऋषीसारखं नेहाने बोबड्या भाषेत म्हटलं.“आई तू तदी येनाय धरी?”ऋषीला बरेच शब्द अजून बोलता यायचे नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना तो काय म्हणतो ते कळायचं नाही. घरचे मात्र खूप हसायचे.“पिल्लू आई आता संध्याकाळी येईल.”“म्हनदे कदी? तिती वादता?( म्हणजे किती