मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४८

  • 2.1k
  • 1.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४८ऑफीसमध्ये नेहाने पाहुण्यांमुळे होणारी स्वतःची चिडचिड व्यक्त केली तेव्हा रंजनाने तिला काही उपाय सुचवले. नेहाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू होते. संध्याकाळी नेहा घरी आली ती चिडलेलीच होतीरात्रीची जेवणं झाली. जेवतानाही आज नेहा काहीच बोलत नव्हती. शेवटी सुधीर म्हणाला,“नेहा आज काय झालंय? अशी गप्प गप्प आहेस.”“काही नाही झालं.”“आई तुता ताय धाद?”नेहाने ऋषीच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही.“नेहा अगं ऋषी काहीतरी विचारतोय.”सुधीर नेहाला म्हणाला. नेहाने सुधीरकडे रागाने एक कटाक्ष टाकला.“नेहा आज काही झाल का ऑफीसमध्ये? आल्या पासून बघतेय तू रोज सारखी हसत घरी आली नाहीस.”सुधीरच्या आईने विचारलं.“काही नाही झालं आई.माझा आज मूड नाही.”“डोकं वगैरे दुखतंय का