पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ११ (अंतिम)

  • 3.1k
  • 1.4k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ११ (अंतिम)  भाग १०  वरून पुढे वाचा  .... “बरोबर आहे त्यांचं” इंस्पेक्टर प्रसाद म्हणाले. त्यांनी किशोर ला दुर्गा कुमारच्या पत्रा बद्दल सांगितलं. हे ऐकून किशोरच्या पायाखालची जमीनच सरकली. माधवी तर भयंकर संतापली. म्हणाली “अहो असं कसं, जे लोकं बँकेत होते, त्यांनी सगळं पाहीलं आहे, हा कोण माणूस आहे असं विपरीत बोलतो आहे? तद्दन खोटं आहे हे” “माधवी मॅडम शांत व्हा. खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. या माणसाला शोधायला आमच्या टीम गेल्या आहेत. तो आल्यावरच कळेल की त्याचा असं पत्र लिहिण्या मागे काय उद्देश आहे तो. पण तुम्ही आणि किशोर