मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५७

  • 2k
  • 981

मला स्पेस हवी पर्व १ भाग 57   मागील भागात आपण बघीतलं की रमण शहा नेहा त्याच्या कह्यात येत नाही म्हणून वैतागला होता. आता पुढे बघू.   नेहाने पहिली जाहिरात शूट झाल्यानंतर दुसऱ्या जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला तीनही लेखकांना ऑफिसमध्ये बोलावलं. दुसरा टूर राजेशने प्लॅन केला होता. त्याची जाहिरात कशी हवी हे सविस्तर नेहाने तिघांना सांगितलं. नेहा म्हणाली,   “घरी जाऊन मी सांगितलेल्या मुद्यांवर विचार करा. काही पॉईंट्स काढा आणि इथे ऑफिसमध्ये येऊन डिस्कस करा.”   यावर क्षेमकल्याणी म्हणाले,   “मॅडम आम्ही घरूनही फोनवर बोलू शकतो. त्यासाठी इथे येण्याची काय आवश्यकता आहे?”   यावर नेहा म्हणाली,   “ सर असं आहे