किमयागार - 40

  • 2.1k
  • 872

किमयागार - वारा.तरुण म्हणाला, तुम्ही त्यांना माझी सर्व कमाई देऊन टाकलीत.किमयागार म्हणाला, खरे आहे, पण तू जर मेला असतास तर तुला त्याचा काय उपयोग होता. तुझ्या पैशाचा तुला जीव वाचवण्यासाठी उपयोग झाला. तरूणाला खरेतर किमयागाराने सैन्य प्रमुखाला जे सांगितले होते त्यामुळे भीती वाटत होती.तो स्वतःला वारा कसा बनवणार होता, तो किमयागार नव्हताच.किमयागाराने एका सैनिकाकडून चहा मागवला आणि थोडासा चहा तरुणाच्या मनगटावर ओतून काहीतरी पुटपुटला त्यामुळे तरुणाला एकदम शांत वाटू लागले.किमयागार म्हणाला भीतीला बळी पडू नकोस नाहीतर तुझे हृदय तुझ्या बरोबर बोलू शकणार नाही. पण मी वारा कसा होईन हे मला माहीत नाही. जो माणूस स्वतःचे भाग्य आजमावत असतो त्याला सर्व