किमयागार - 40 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 40

किमयागार - वारा.

तरुण म्हणाला, तुम्ही त्यांना माझी सर्व कमाई देऊन टाकलीत.
किमयागार म्हणाला, खरे आहे, पण तू जर मेला असतास तर तुला त्याचा काय उपयोग होता. तुझ्या पैशाचा तुला जीव वाचवण्यासाठी उपयोग झाला.
तरूणाला खरेतर किमयागाराने सैन्य प्रमुखाला जे सांगितले होते त्यामुळे भीती वाटत होती.
तो स्वतःला वारा कसा बनवणार होता, तो किमयागार नव्हताच.
किमयागाराने एका सैनिकाकडून चहा मागवला आणि थोडासा चहा तरुणाच्या मनगटावर ओतून काहीतरी पुटपुटला त्यामुळे तरुणाला एकदम शांत वाटू लागले.
किमयागार म्हणाला भीतीला बळी पडू नकोस नाहीतर तुझे हृदय तुझ्या बरोबर बोलू शकणार नाही.
पण मी वारा कसा होईन हे मला माहीत नाही. जो माणूस स्वतःचे भाग्य आजमावत असतो त्याला सर्व काही पाहिजे असेल तेव्हा कळते.
स्वप्नपूर्ती न होण्याचे प्रमुख कारण अपयशाची भीती असते.
मला अपयशाची भीती वाटत नाही.
मी विचार करतोय माझे रुपांतर वाऱ्यात कसे होईल. तुला ते शिकावे लागेल, तुझे जीवन त्यावर अवलंबून आहे. किमयागार म्हणाला. पण मला ते जमले नाही तर?.तरूण म्हणाला.
मग तुला स्वप्नपूर्ती आधीच मरावे लागेल.
पण हा मृत्यू इतर लाखो लोकांपेक्षा वेगळा असेल, त्याना आपले भाग्यच माहिती नसते.
पण घाबरू नकोस, मृत्यूची भीती माणसाला जीवनाविषयी अधिक जागृत करते.

पहिला दिवस पार पडला. जवळच लढाई चालू होती आणि जखमीना वस्तीवर आणले जात होते. मरण पावलेल्या व्यक्तींच्या जागी नवीन सैनिक पाठवले जात, मृत्यूमुळे काही बदलतं नाही.
एक दिवस किमयागार ससाण्याला घेऊन किमयागार बाहेर गेला होता तिथे तरुण गेला व बोलला मला अजुनही कळत नाही मी वारा कसा काय होणार.
मी तुला सांगितले आहेच की हे जग परमेश्वराचे दिसणारे तत्व आहे. आणि किमयागारी ही भौतिक वस्तू व आध्यात्मिक परिपूर्णतेला एकमेकांच्या संपर्कात आणण्याचे काम करते.
तरूण म्हणाला, तुम्ही काय करीत आहात. किमयागार म्हणाला, ससाण्याला खाद्य मिळवून देतोय.
तरुण म्हणाला, मी स्वतःला वारा करू शकलो नाही तर आपण मरणारचं आहोत मग ससाण्याला खाद्य देण्यात काय फायदा आहे. किमयागार म्हणाला, तू मरणार आहेस कारण मी स्वतःला वारा बनवू शकतो.
दुसऱ्या दिवशी तरुण एका टेकडीवर गेला . सैनिकांनी त्याला जाउ दिले कारण त्यांना माहीत होते की हा जादूगार आहे आणि स्वतः ला वारा बनवू शकतो, आणि त्याच्याजवळ राहण्याची त्याना गरज वाटत नव्हती कारण त्यांना माहीत होते की वाळवंट पार करणे अवघड आहे.‌
तो वाळवंटाकडे पाहत आणि ह्रदयाचा आवाज ऐकत बसला होता. तरुणाला माहीत होते की ते घाबरले आहे , सध्या दोघांची भाषा एकच होती.
तिसऱ्या दिवशी प्रमुखाने सर्वांना बोलावले आणि किमयागाराला म्हणाला, चला, तरुण काय करतो ते पाहू.
किमयागार म्हणाला हो, चला. तरुणाने सर्वाना कालच्या टेकडीकडे नेले आणि
म्हणाला बसा !. थोडा वेळ लागेल. प्रमुख म्हणाला आम्हाला घाई नाही.
तरूण क्षितिजाकडे बघत होता. खूप अंतरावर पर्वत, टेकड्या,दगड आणि काही झुडुपे होती, ती अशा जागेतही जगली होती की तिथे झुडुपे जगतील असे वाटलेच नसते.
ते त्या वाळवंटात महिनोनमहीने प्रवास करत होते पण त्याबद्दलची फारच थोडी माहिती झाली होती असे त्याला वाटले.
त्यामध्ये इंग्रज, तांडे, टोळी युद्ध, आणि खजुराची झाडे व विहीरी असलेले ओॲसिस हे होते.
वाळवंट म्हणाले, तुला काय हवे आहे. तू माझ्याकडे बघण्यात खूप वेळ घालवला आहेस.
मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तीला तू सांभाळत आहेस आणि मी वाळू कडे बघतो तेंव्हा तिच्याकडे पाहत आहे असे वाटते.
मला तिच्याकडे परत जायचे आहे आणि वाऱ्यात परावर्तित होण्यासाठी तुझी मदत हवी आहे.
वाळवंट म्हणाले, प्रेम म्हणजे काय?. प्रेम म्हणजे या वाळूवरील आकाशातील ससाण्याचे विहरणे. कारण तू त्याच्यासाठी हिरवेगार कुरण आहेस जिथे त्याला भक्ष्य भेटते. त्यांना तुझे दगड, टेकड्या , पर्वत माहीत आहेत आणि तुझे त्यांच्यावर उपकार आहेत.
वाळवंट म्हणाले, ते जेव्हा भक्ष्य चोचित घेतात तेव्हा त्याबरोबर माझाही अंश असतो. वर्षानुवर्षे मी त्याला भक्ष्य मिळावे म्हणून काळजी घेतो, माझ्याकडे असलेले थोडेफार पाणी त्याला देतो व भक्ष्य कुठे आहे ते दाखवतो.

ससाणा माझ्या वाळूवर उतरतो आणि माझ्याकडे निर्माण झालेले खाद्य घेऊन जातो. तरूण म्हणाला, म्हणूनच तू प्राणी निर्माण केलेस जेणेकरून सर्वांना खाद्य मिळेल.
आणि माणसे पण वाळूचे पोषण करत असतात त्यामुळे परत खाद्य तयार होते.
जग असेच चालत असते. आणि हेच ते प्रेम आहे. तेच भक्ष्याला ससाणा , ससाण्याला मानव , धातूला सोने बनवते आणि सोने परत मातीत मिसळते.
वाळवंट म्हणाले मला काही कळले नाही. तरूण म्हणाला,तुला एवढे तरी कळले ना, तुझ्या या वाळूवर कुठेतरी एक स्री माझी वाट पहात आहे आणि म्हणूनच मला वारा बनायचे आहे. वाळवंट क्षणभर काहीच बोलले नाही. मग म्हणाले मी तुला वाळू देउ शकतो पण वारा बनवू शकत नाही.
आता वारा वाहू लागला होता, दूर काही अंतरावर टोळीवाले काहीतरी बोलत होते.
वारा तरुणाच्या चेहऱ्यावर आला.
त्याला वाळवंट व तरुणाचे संभाषण कळले होते. कारण वाऱ्याला सर्व माहिती असते.
वारा सगळीकडे वाहत असतो त्याला न जन्माचे ठिकाण असते ना मृत्यूचे.
तरूण वाऱ्याला म्हणाला मला मदत कर. तूच माझ्या प्रेमिकेचा आवाज माझ्यापर्यंत पोहचवला होतास. वारा म्हणाला, तू वाळवंटाची व माझी भाषा कुठे शिकलास. तरूण म्हणाला ह्रदयाकडून.
वाऱ्याला अनेक नावे आहेत.
या भागात त्याला
सिरोक्को म्हणतात कारण तो समुद्राकडून आर्द्रता आणत असतो. तरुणाच्या प्रदेशात त्याला लव्हेंटर म्हणत कारण तो वाळवंटातील वाळू आणि मुरीश लोकांच्या किंकाळ्या आणतं असे.‌
खरेतर वारा कुठुनही येत नाही आणि कुठेही जात नाही आणि म्हणूनच तो वाळवंटापेक्षा ताकदवान आहे. कधी तरी कुणी तरी वाळवंटात झाडे लावेल किंवा मेंढ्या वाढवेल पण वाऱ्याला कोणी थांबवू शकत नाही.
वारा म्हणाला, तू वारा होऊ शकत नाहीस आपण दोघे वेगळ्या गोष्टी आहोत.
तरूण म्हणाला, हे खरे नाही, मी प्रवासात किमयागाराच्या गुप्त गोष्टी शिकलो आहे. माझ्यामध्ये वारा, वाळवंट, समुद्र, तारे आणि या विश्वात असलेल्या सर्व गोष्टी आहेत. आपणा सर्वांना बनवणारा हात एकचं आणि आपल्या सर्वांमध्ये एकचं आत्मा आहे. मला तुझ्यासारखे व्हायचे आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात जायचे आहे.
समुद्र ओलांडून जायचे आहे, माझा खजिना लपवून ठेवणारी वाळू उडवून टाकायची आहे. माझ्या प्रेमिकेचा आवाज बरोबर न्यायचा आहे. वारा म्हणाला, मी तुमचे बोलणे ऐकले आहे. प्रत्येकाचे स्वतःचे भाग्य असते, पण माणूस वारा कसा होईल?.
तरूण म्हणाला, मला फक्त काही क्षणांसाठी वारा बनायचे आहे. आपण मानव आणि वाऱ्याच्या अमर्याद शक्यतांबद्दल बोलू.
वाऱ्याची उत्सुकता वाढली.
आधी कधी घडले नाही असे काही घडणार होते. त्याला म्हणायचे होते की, माणसाला वारा कसा करायचे त्याला माहीत नव्हते.
वाऱ्याला बऱ्याच गोष्टी कशा करायच्या माहीत होते. त्याने वाळवंट तयार केले, बोटी बुडवल्या होत्या. जंगलातून फिरला होता. मधुर संगीत व निरनिराळे गोंधळाचे आवाज असलेल्या शहरांतून फिरला होता. त्याला वाटायचे आपण खूप ताकदवान आहोत, पण आता वाटू लागले तसे खरंच आहे का?
तरूण म्हणाला, यालाच प्रेम म्हणतात. त्याच्या लक्षात आले होते वारा त्याची इच्छा पूर्ण करण्याचा विचार करीत आहे.