Kimiyagaar - 9 books and stories free download online pdf in Marathi

किमयागार - 9

मुलगा काही तरी बोलणार इतक्यात तिथे एक फुलपाखरू आले आणि दोघां मध्ये फिरू लागले. मुलाला आठवले की फुलपाखरू शुभ शकुन दर्शवणारे असते असे त्याचे आजोबा म्हणाले होते. तसेच तीन पातींच्या गवतामध्ये चार पाती गवत मिळणे व पाली याही शुभ शकुन दर्शवणारे आहेत असे त्यांनी सांगितले होते.
त्याच्या मनातील विचार ओळखत म्हातारा म्हणाला तुझे आजोबा बरोबर सांगत होते हे शुभ शकुन आहेत. त्याचवेळी म्हाताऱ्याने आपला कोट बाजूला केला आणि मुलाचे डोळे त्याला जे दिसले त्यामुळे दिपले. म्हाताऱ्याने सोन्याचे जड कवच घातले होते व त्यावर मौल्यवान खडे व रत्ने होती. म्हणजे म्हातारा खरंच राजा होता व चोरांपासून वाचण्यासाठी त्याने हा पेहराव केला होता. म्हाताऱ्याने कवचावरून एक पांढरा व एक काळा काढला व मुलाला देत म्हणाला हे खडे घे. याना उरीम व थुम्मीम असे म्हणतात. काळा खडा ' हो ' व पांढरा खडा‌ ' नाही ' असे सांगणारा आहे. तुला शकुन चिन्हांचा अर्थ समजणार नाही तेव्हा तू याचा वापर करून अर्थ शोधू शकशील. तू योग्य रितीने ( वस्तुनिष्ठ प्रश्न ) हो किं नाही असे उत्तर मिळू शकणारे प्रश्न विचार. पण शक्यतो तू स्वतःचे निर्णय स्वतःच घे. तुला कळलेच आहे की खजिना पिऱ्यामिड मध्ये आहे. मी तुला निर्णय घेण्यात मदत व्हावी यासाठीच सहा मेंढ्या देण्यास सांगितले होते.
मुलाने खडे त्याच्या पिशवीत ठेवले व ठरवले की तो स्वतःच निर्णय घेईल.
म्हातारा म्हणाला तूं आता जे काही देणेघेणे करीत आहेस त्याचा हेतू एकच आहे. शकुनचिन्हांची भाषा विसरू नको आणि तुझे भाग्य तुला मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करित राहा. जाण्यापूर्वी मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. एका व्यापाऱ्याने त्याच्या मुलाला सांगितले की तू सर्वात बुद्धिमान माणसांकडे जाऊन आनंदाचे गुपित काय आहे ते जाणून घे. मुलगा वाळवंटातून चाळीस दिवसाचा प्रवास करून एका उंच डोंगरावरील राजवाड्याजवळ पोहोचला जेथे तो माणूस राहात होता. मुलाला वाटले होते की आपल्याला साधू दिसेल पण आत प्रवेश करताच त्याला खूप धूमधामीचे वातावरण दिसले . लोक इकडे तिकडे फिरत होते, काही लोक कोपऱ्यांवर बोलत उभे होते. मधुर संगीत वाजवणारा वाद्यवृंद तेथे बसलेला होता. तेथें मध्यभागी उत्तमोत्तम पदार्थांच्या थाळ्या ठेवलेल्या होत्या. तो बुद्धिवंत प्रत्येक माणसाशी बोलत होता जवळपास दोन तासांनी तो मुलाला भेटला. त्याने मुलाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. व त्याच्या येण्याचा हेतू जाणून घेतल्यानंतर म्हणाला की आता त्याला गुपित सांगण्याइतका वेळ नाही पण मी तूला एक गोष्ट करण्यास सांगणार आहे. आणि त्याच्या हातात दोन तेलाचे थेंब असलेला चमचा देत म्हणाला माझा राजवाडा बघ पण फिरत असताना या चमच्यातील तेल सांडता कामा नये. मुलगा जिन्यांवरून चढ उतार करीत व चमच्यावर लक्ष ठेवत राजवाडा बघत फिरून दोन तासांनी परत आला. बुद्धिवंताने विचारले माझ्या डायनिंग हॉल मध्ये असलेले पर्शियन पडदे पाहिलेस का ?. माझ्या लायब्ररी मधील चर्मपत्रे पाहिलीस का? माझ्या माळ्याला जी बाग बनवायला दहा वर्षे लागली ती बाग पाहिली का? मुलगा म्हणाला मी यातले कांहीच पाहिले नाही माझे सर्व लक्ष तेल सांडणार नाही ना यांतच होते.
बुद्धिवंत म्हणाला , परत सगळा राजवाडा बघ. ज्याच्या घराबद्दल तुला काही माहिती नाही अशा माणसावर तू विश्वास कसा ठेवणार ?. मुलगा परत चमचा घेऊन निघाला. यावेळी मात्र त्याने भिंती वरील नक्षिकाम पाहिले , बाग, सुंदर फुले इ. सर्व पाहिले आणि प्रत्येक गोष्ट किती काळजीपूर्वक निवडलेली होती‌ तेही त्याला लक्षात आले. परत आल्यावर त्याने या सर्वांचे वर्णन बुद्धिवंता कडे केले. बुद्धिवंत म्हणाला चमच्यातील तेलाचे काय ?. मुलाने चमच्याकडे पाहिले तर तेल गळून गेले होते. बुद्धिवंत म्हणाला की गुपित हेच आहे की तुम्ही सर्व उत्तम गोष्टी पहा , आस्वाद घ्या पण आपल्या हातातील चमच्यातील तेल विसरू नका.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED