किमयागार - 10 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 10

मेंढपाळ गोष्ट ऐकून काहीच बोलला नाही. त्याला राजाने सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ कळला होता. मेंढपाळ कितीही प्रवास करो पण त्याने त्याच्या मेंढ्यांना विसरता कामा नये.
म्हाताऱ्याने मुलाचे हात हातात घेतले नंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला व तो मेंढ्यांना घेऊन गेला.
तरिफाच्या एका टोकाला 'मुर' लोकांनी बांधलेला एक किल्ला आहे. किल्ल्यावरून अफ्रिकेची झलक दिसते.
सालेमचा राजा (म्हातारा) त्या किल्ल्यावरील भिंतीवर बसला होता. त्याच्या बाजूला असलेल्या मेंढ्या नवीन मालकाकडे थोड्या बुजल्या असल्या तरी त्याना बदल कळत होता.
राजाने एक छोटे जहाज बंदरातून बाहेर पडताना दिसले, त्याच्या मनात आले आता तो मुलगा त्याला कधीच भेटणार नव्हता.
मुलाच्या मनात आले की आफ्रिका खुप वेगळी आहे. तो एका बारमध्ये बसला होता. काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत होते. स्त्रियानी चेहऱ्यावर कापड घालून चेहरा झाकले होते.
प्रवासाच्या गडबडीत तो एक गोष्ट विसरला होता आणि ती त्याच्या मार्गात अडथळा ठरणार होती. ती म्हणजे भाषा. या भागात अरबी भाषा बोलली जात असे.
बार मधील माणूस त्याच्या जवळ आला. मुलाने समोरच्या टेबलावर एक माणूस जे पेय पित होता त्याकडे बोट दाखवले. त्याला वाईन हवी होती पण पेय कोणते असेल ही गोष्ट सध्या तरी महत्वाची नव्हती.
मेंढ्या विकल्यामुळे त्याच्याकडे पुरेसे पैसे आले होते. मुलाला माहीत होते की पैशाने बरेच काही होत असते. ज्याच्याकडे पैसे असतील त्याला कमी अडचणी येतात.
आता थोड्याच दिवसांत तो पिरॅमिड जवळ जाणार होता. शकुनांबद्दल विचार करताना त्याच्या लक्षात आले की जेव्हा तो मेंढ्यांना घेऊन फिरत असे तेव्हा तेव्हा तो आकाश व जमीनीचे निरिक्षण करून रस्ता व थांबण्याचे नियोजन करत असे. विशिष्ट पक्षाचे दिसणे म्हणजे तेथे सर्प असणेंची निशाणी तसेच काही झुडुपांवरून तिथे पाणी आहे असे समजत असे.
इतक्यात एक पाश्र्चात्य कपडे घातलेला माणूस त्याच्या जवळ येऊन स्पॅनिश भाषेत म्हणाला तू कोण आहेस ?. मुलाला आपली भाषा ऐकून बरे वाटले पण तो माणूस त्याच शहरातील होता. मुलगा म्हणाला बसा ! आपण काहीतरी घेउ, माझ्यासाठी वाईन मागवा. तो माणूस म्हणाला येथे वाईनला बंदी आहे. मुलगा म्हणाला मला पिरॅमिड जवळ जायचे आहे आणि त्याला तो खजिन्याबद्दल सांगणार इतक्यात त्याच्या लक्षात आले की तो अरब माणूस
हिस्सा मागू शकतो आणि आपल्या हातात नसलेली कोणतीही गोष्ट कुणाला देण्याचा वायदा करू नये. तू जर मला तेथे नेलेस तर गाईड म्हणून मी तुला पैसे देईन. तुला माहित आहे का तेथे कसे जायचे?. अरब म्हणाला. हे बोलणे चालू असताना बारचा मालक तिथे येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागला, मुलाला हे विचित्र वाटले पण त्याने दुर्लक्ष केले.
अरब म्हणाला पूर्ण वाळवंट पार करावे लागते, खूप पैसे लागतील. तुझ्याकडे आहेत का?. मुलाने पैसे दाखवले ते दाखवत असता तो मालक पण बघत होता. मालक व अरबामध्ये काही बोलणे झाले तसे अरब मुलाला म्हणाला आपण येथून जाऊया ते निघाले तसे मालकाने मुलाला पकडले व त्याला काही सांगू लागला अरबाने त्याला सोडवले व म्हणाला त्याला तुझे पैसे हवे आहेत, येथे खूप चोर आहेत.
त्या माणसावर विश्वास ठेवून तो निघाला. अरब म्हणाला आपण उद्यापर्यंत जाऊ पण त्यासाठी उंट लागतील. ते बोलत बोलत मार्केट मध्ये पोहोचले होते, अरबाने पैसे घेतले. मुलाने विचार केला आपण त्याच्यावर लक्ष ठेवून राहू आपण त्याच्यापेक्षा बळकट आहोत. बाजारात फिरताना त्याला एका दुकानात छान तलवार दिसली. तो त्या तरुणाला म्हणाला तलवारी ची किंमत विचार व तो तलवार बघू लागला त्याचे लक्ष अरबावरून हलले, तलवारीवरून लक्ष हलल्यावर त्याच्या लक्षात आले की बाजारात अनेक लोक फिरत आहेत पण तो तरुण कोठेच दिसत नाही.