किमयागार - 4 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 4

म्हातारी जरा वेळ शांत बसली मग परत त्याचा हात हातात घेऊन गंभीरपणे पाहू लागली.
" मी तुझ्या कडून फी घेणार नाही पण तुला मिळणाऱ्या खजिन्यातील दहावा हिस्सा तू मला दे". त्याला मनातून हसू आले , चला या खजिन्याच्या स्वप्नामुळे आपले पैसे आत्ता तरी वाचले. 'ठिक आहे, स्वप्नाचा अर्थ सांग' तो म्हणाला. ' तू आधी शपथ घे की आता मी तुला जे काही सांगणार आहे त्याचा मोबदला म्हणून तू खजिन्याचा दहावा हिस्सा देशील. त्याने शपथ घेतली. तीने परत प्रभू येशू कडे पाहून शपथ घेण्यास सांगितले. मी याचा अर्थ सांगू शकते पण ते खूप कठीण काम आहे म्हणून मला वाटते की तुला जे मिळेल त्यातला दहावा हिस्सा मला मिळावा. " तर मग ऐक ! तू या पिरॅमिडच्या देशात गेले पाहिजेस. मी कधी याबद्दल ऐकलेले नाही पण त्या मुलीने तुला दाखवलेय म्हणजे तो अस्त्तित्वात आहे. तेथे तुला खजिना सापडेल व तू श्रीमंत होशील.' त्याला वाटले हे ऐकण्यासाठी तो आला नव्हता पण ठिक आहे पैसे तर खर्च होत नाहीयेत. मला अशा गोष्टीत वेळ घालवायचा नाहीये तो म्हणाला. म्हातारी म्हणाली, मी तूला म्हणालेच की स्वप्न वेगळे आहे पण काही वेळा साध्या वाटणाऱ्या गोष्टींतून असामान्य घडू शकते. पण ते हुशार लोकांनाच कळते. मी फार हुशार नसल्यानेच मी ही भविष्य सांगण्याची कला शिकून घेतली. ' ठिक आहे, पण मी इजिप्तला जाणार कसा?.' मी फक्त स्वप्नांचे अर्थ सांगते ती पूर्ण कशी करायची मला माहित नाही, म्हणून तर मी उदरनिर्वाहासाठी माझ्या मुलींवर अवलंबून आहे. '
आणि मी ईजिप्त ला गेलोच नाही तर ?.'
' मग मला पैसे मिळणार नाहीत आणि ही गोष्ट काय मला नवीन नाही, तू आता जावू शकतोस आधीच खूप वेळ गेलाय' जिप्सी म्हणाली.
तो नाराज झाला आणि त्याने ठरवले की आता स्वप्नाबद्दल विचार करायचा नाही, अजून बरीच कामे आहेत. तो मार्केट मध्ये गेला. जुने पुस्तक देऊन नवीन जाड पुस्तक घेतले. आणि नवीन भरून घेतलेल्या वाईनची चव घेण्यासाठी एका बाकावर बसला. हवेत उष्मा होता. वाईन घेतल्यावर त्याला तजेला आला. मेंढ्या त्याने एका मित्राच्या तबेल्यात ठेवल्या होत्या. त्याच्या शहरात खूप ओळखी झाल्या होत्या. प्रवासातील ही गोष्ट त्याला आवडत असे की नवीन लोक भेटतात व त्यांच्याबरोबर फार वेळ राहवे लागत नाही. तो जर विद्यालयात असता तर रोज तेच तेच लोक भेटले असते व ते जीवनाचा एक भाग बनले असते. आणि मग लोकांच्या आपल्या बद्दलच्या अपेक्षा वाढतात आणि त्याना माणूस आपल्या मनासारखा वागला नाही की राग येतो व ते त्याच्याकडून बदलाची अपेक्षा करतात. प्रत्येकाच्या दुसऱ्याने कसे वागावे याबद्दलच्या कल्पना ठरलेल्या असतात पण स्वत: बद्दल ते असा विचार करत नाहीत. त्याने मेंढ्याना आणण्यासाठी सूर्य थोडा खाली येण्याची वाट पहायचं ठरवले. बरोबर तीन दिवसांनी तो व्यापाऱ्याच्या मुलीबरोबर असणार होता.
त्याने पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीला त्यात दफनविधीचे वर्णन होते. त्यात अनेक लोकांबद्दल लिहिले होते. त्यातल्या लोकांची जी नावे होती ती उच्चारण्यास अवघड होती. त्याच्या मनात आले तो जर लेखक असता तर एका वेळी एकाच माणसाबद्दल लिहिले असते म्हणजे वाचकाला नांवे लक्षात ठेवावी लागली नसती. आता त्याचे वाचनात जरा लक्ष लागू लागले होते व ती कथा बरी वाटू लागली होती. तो वाचत असताना बाकावर एक म्हातारा येऊन बसला व त्याच्याशी बोलायला लागला. चौकातील माणसांकडे बोट दाखवत विचारले ते काय करित आहेत?. त्याने थोड्या रुक्षपणे उत्तर दिले 'काम करतायत' जेणेकरून म्हाताऱ्याला समजेल की त्याला वाचन करायचे आहे. त्याच्या मनात खरेतर आता विचार चालू होता की मेंढ्यांची लोकर त्या मुलीसमोर काढावी म्हणजे तिला कळेल की त्याला अवघड गोष्टी पण करता येतात. त्याने या प्रसंगाची मनात अनेक वेळा उजळणी केली होती की ज्यावेळी तिला समजेल की लोकर मागून सुरू करून पुढे काढावी लागते तेव्हा तिचा चेहरा कसा दिसेल, आणि लोकर काढण्याच्या वेळी काही चांगल्या गोष्टी सांगायच्या ठरवून ठेवल्या होत्या, त्या खरे तर त्याने पुस्तकात वाचल्या होत्या आणि त्या तो स्वतःच्या म्हणून सांगणार होता, तिला वाचायला येत नसल्याने तिला ते कळणार नव्हतेच.