किमयागार - 11 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

किमयागार - 11

मुलाला मनातुन असेच वाटत होते की गर्दीमुळे तो तरुण हरवला असे वाटत असेल. थोडा वेळ याच विचारात गेला, आणि जवळच्या टॉवरवर एक धर्मगुरू आले तेंव्हा सर्व जण कपाळ जमीनीवर टेकवून बसले आणि अचानक सर्वजण स्टॉल बंद करून निघून गेले. संध्याकाळ झाली.
तो एका नवीन देशात होता , तेथील भाषा पण त्याला येत नव्हती. तो मेंढपाळ पण राहिला नव्हता. आणि त्याच्या खिशात परत जाण्यासाठी पैसे पण नव्हते. सूर्योदय व सूर्यास्त यामध्ये बरचं काही घडून गेले होते. अचानक सर्व आयुष्य बदलले होते. त्याला रडू येऊ लागले होते. मार्केट रिकामे होते, तो घरापासून दूर होता, त्याच्या अश्रुंचा बांध फुटला. त्याला वाटू लागले की जे स्वप्ने बघतात त्यांचेवर देवाने अशी वेळ आणू नये.
माझ्याकडे मेंढ्या होत्या तेव्हा मी आनंदी असे, माझ्या जवळचे लोक पण खुश असत. पण आत्ता मी दु:खी आणि एकटा आहे. त्या माणसाने फसवल्यामुळे माझ्या मनात कडवटपणा व लोकांच्या बाबतीत अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. मला काही मिळवता येईल का नाही असे वाटू लागले आहे. मुलाच्या मनात असे विचार चालू होते. त्याने पिशवी उघडली व त्यात बघितले जहाजात खाल्लेल्या सॅंडवीचचा तुकडा असेल या अपेक्षेने. पण त्यात फक्त पुस्तक, जाकीट आणि म्हाताऱ्याने दिलेले खडे होते.
खडे पाहिल्यावर त्याला जरा बरे वाटले. ते खडे विकून आपण परतीचे तिकीट काढू असे वाटले. त्या माणसाने एक गोष्ट खरी सांगितली ती म्हणजे हे गाव चोरांनी भरलेले आहे. तो बारमालक त्याला काय सांगू पहात होता ते त्याला आता कळले. तो त्याला तरूणापासून सावध करू इच्छित होता. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीकडे बघताना आपल्याला काय घडायला हवे त्या नजरेनेच बघतो प्रत्यक्षात काय असेल याचा विचार करत नाही.
खड्यावरून हात फिरवताना त्यांची उष्णता त्याला जाणवली तेच आता त्याच्या दृष्टीने खजिना होते. त्याला म्हाताऱ्याची आठवण झाली. तो म्हणाला होता त्याना उरीम आणि थुम्मीम म्हणतात आणि ते तुला शकुन चिन्हे कळण्यासाठी मदत करतील. मुलाने खडे आत टाकले. म्हाताऱ्याने सांगितले होते की स्पष्ट प्रश्न विचार आणि म्हणून त्याने विचारले म्हाताऱ्याचे आशिर्वाद अजुन माझ्या पाठीशी आहेत का?. आणि खडा बाहेर काढला तो ' हो ' चा होता. आणि दुसरा प्रश्न मला खजिना मिळणार आहे का असे विचारत त्याने पिशवीत हात घातला तर ते दोन्ही खडे पिशवीच्या भोकातून खाली पडले. त्याने ते परत पिशवीत ठेवले. त्याला म्हाताऱ्याचे शब्द आठवले की शकुन चिन्हे ओळख व त्याप्रमाणे वाग. खडे पिशवीत ठेवले तसं त्याच्या मनात विचार आला काही प्रश्न न विचारणेचं योग्य , कारण त्याचे उत्तर जाणून घेतल्यानंतर माणूस भाग्यापासून दूर पळू शकतो. (प्रयत्न करणे सोडून देतो).
किमयागार -निर्णय
मी आता माझे निर्णय स्वतःच घेणार आहे त्याने ठरवले. खड्यानी त्याला सांगितले होते की म्हातारा त्याच्या सोबत आहे आणि त्याला आत्मविश्वास वाटू लागला. तो विचित्र ठिकाणी नव्हता तो नवीन ठिकाणी होता आणि त्याला नेहमीच नव्याचा शोध घेण्याची इच्छा होती.
तो पिऱ्यामीडपर्यंत जरी पोहोचला नसला तरी इतर मेंढपाळांपेक्षा लांब अंतरावर आला होता, जरी ते नवीन जग म्हणजे एक रिकामे पडलेले मार्केट होते. त्याच्या लक्षात आले की त्याला आता एक फसवला गेलेला दुर्देवी माणूस व खजिन्याच्या शोधात निघालेला धाडसी माणूस याची निवड करायची होती. आणि तो स्वत:शी म्हणाला मी खजिन्याच्या शोधात निघालेला साहसी माणूस आहे.
किमयागार - क्रिस्टल व्यापारी (स्फटीक, बिलोरी काच) .
व्यापाऱ्याची आजची सकाळ ही नेहमी सारखी काळजीने व्यापलेलीच होती. त्याचे दुकान एका टेकडीवर होते, तेथे थोडेचं लोक येत असतं. तो या ठिकाणी वीस वर्ष होता. त्याला क्रिस्टल वस्तू आणणे व विकणे एवढेंच काम येत होते. एकेकाळी त्याचे दुकान खुप लोकांना माहीत होते. अरब व्यापारी, फ्रेंच, इंग्रज प्रवासी, जर्मन सैनिक. त्या काळात व्यापार चांगला होत असे. काळ बदलला, टॅंझीअर गाव पण बदलले.