किमयागार - 12 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 12

भाग ११ मध्ये मार्केटमधील प्रसंगामध्ये काही भाग पोस्ट करायचा राहिला होता तो आता पाठवत आहे. क्षमस्व.
किमयागार - मार्केट
मुलगा कोणीतरी हलवल्यामुळे जागा झाला. तो मार्केटमध्ये झोपला होता आणि मार्केट परत चालू होऊ लागले होते. तो आपल्या मेंढ्यांना शोधू लागला. त्याच्या लक्षात आले की तो आता नवीन जगात होता. आता मेंढ्यांसाठी चारा पाणी शोधायचे नव्हते.‌ आता तो खजिन्याच्या शोधात जाणार होता. त्याच्या खिशात एक पैसाही नव्हता पण श्रद्धा व आत्मविश्वास होता.
त्याने रात्रीच ठरवले होते की हिरो फक्त पुस्तकात नसतात. तो साहसी माणूस होणार आहे.
तो मार्केटमध्ये हळूहळू चालू लागला. व्यापारी त्यांची दुकाने लावत होते. मुलाने एका मिठाईवाल्याला दुकान मांडण्यात मदत केली. मिठाईवाला आनंदी दिसत होता तसेच त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते, त्याला जीवन म्हणजे काय ते कळले होते आणि तो नव्या दिवसाची सुरूवात उत्साहाने करित होता. हा मिठाईवाला मिठाई बनवण्याचे कारण त्याला नंतर प्रवास करायाचाय किंवा व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न करायचं असं नसून तो त्याचा आवडीचा व्यवसाय होता. त्याच्या लक्षात आले की म्हाताऱ्याप्रमाणे त्यालाही एखादा माणूस त्याच्या नियतीच्या जवळ आहे की नाही हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतेय.
जेव्हा दुकान पूर्ण लावून झाले तेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याला एक मिठाई खायला दिली. मुलाने त्याचे आभार मानले व तेथून निघाला. थोडं अंतर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की ते दोघे जेव्हा संभाषण करत होत तेव्हा एक स्पॅनिश व एक अरबी भाषेत बोलत होता पण तरीही त्यांना एकमेकांचे बोलणे कळत होते. अशी एक भाषा असते जी शब्दांवर अवलंबून नसते आणि हा अनुभव त्याने मेंढ्या बरोबर घेतला होता आणि आता माणसांबाबतही.
तो नवीन गोष्टी शिकत होता. अशा कांहीं गोष्टी होत्या ज्याचा त्याला अनुभव होता पण ज्या कधी लक्षात आल्या नव्हत्या कारण त्या गोष्टी सवयीच्या झाल्या होत्या. मी जर शब्दांचा अर्थ न कळता भाषा समजु शकतो तर मला सर्व काही समजू शकेल. तो थोडा शांत झाला व त्याने ठरवले की टॅंझीअरमधील छोट्या रस्त्यावरून फिरुया. शकुन चिन्हे ओळखण्यासाठी हे जरुरीचे आहे. यासाठी सहनशक्तीची आवश्यकता आहे. पण मेंढपाळ मुळातच सहनशील असतात. तो मेंढ्याबरोबर असतानाचे अनुभव आता या अवस्थेत कामी येत आहेत. शेवटी सर्व गोष्टी एकचं असतात.
किमयागार - क्रिस्टल व्यापारी
जवळचे क्युटा शहर भरभराटीला आले आणि येथील व्यापार कमी झाला. बरेच व्यापारी गाव सोडून गेले, त्या टेकडीवर फारचं थोडी दुकाने राहिली होती. त्यामुळे लोक टेकडीवर येत नव्हते. त्याने आपली सकाळ जाणाऱ्या येणाऱ्या थोड्याफार लोकांकडे बघण्यात घालवली. आणि जेवणाच्या वेळेच्या आधी एक मुलगा दुकाना समोर थांबला. त्याचा ड्रेस बरा होता, तरीही व्यापाऱ्याच्या अनुभवी नजरेने ओळखले की या मुलाकडे खर्च करण्याइतके पैसे नाहीत. पण त्याने तो मुलगा जाईपर्यंत जेवायला न जाण्याचे ठरवले. दुकानात एक बोर्ड लावलेला होता ज्यावर तिथे मिळणाऱ्या वस्तूंची यादी लिहिली होती.
मुलाला काउंटरवर एक माणूस दिसला. तो मुलगा म्हणाला तुमची परवानगी असेल तर मी ही भांडी साफ करतो. ती आता ज्या स्थितीत दिसतायत ती कोणी खरेदी करणार नाही. व्यापारी काही बोलला नाही. त्याबदल्यात तुम्ही मला काही तरी खायला द्या. तरीहि व्यापारी गप्पच बसला. मुलाने ठरवले की आपणच काहीतरी केले पाहिजे. त्याने पिशवीतून जाकीट काढले व दुकानाच्या काचा व वस्तू साफ करायला सुरुवात केली. अर्ध्या तासात सर्व सफाई झाली. तो सफाई करत असताना दोन माणसे दुकानात आली व त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या. सफाई पूर्ण झाल्यावर मुलगा म्हणाला आता मला खायला द्या. व्यापारी म्हणाला, चल , आपण आता जेवण करू. ते जवळच्या हॉटेल मधील एकमेव टेबलावर बसले. तो व्यापारी हसून म्हणाला, तू सफाई केली नसतीस तरी मी तुला खायला दिले असते. कुराण अन्नदान करणेस सांगते. पण तुम्ही मला ते का करू दिलेत ॽ.
कारण क्रिस्टल घाण झाले होते आणि तू काय किंवा मी काय आपल्या मनातील विचार साफ करणे जरुरीचे होते. त्यांचे जेवण झाल्यावर व्यापारी मुलाला म्हणाला, तू माझ्याकडे काम करावे असे मला वाटते, तू काम करित असतां दोन गिह्राइक आले व हा चांगला शकून आहे. व्यापारी म्हणाला तू माझ्यासाठी काम करशील का ?.