किमयागार - 5 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 5

तो म्हातारा पाठ सोडत नव्हता. तो म्हणाला तो खुप थकलाय आणि तहान लागलीय आणि म्हणाला मला थोडी वाईन देशील का?. त्याने म्हाताऱ्याला बाटलीचं दिली म्हणजे तो एकदाचा जाईल. पण त्या म्हाताऱ्याला बोलायचेच होते .
त्याने विचारले तू कोणते पुस्तक वाचतोयस?. खरेतर त्याला एवढा राग आला होता की वाटले बाकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसावे पण ते उद्धटपणाचे वाटले असते, त्याच्या वडिलांनी त्याला मोठ्या माणसांचा आदर करण्यास शिकवले होते. मग मुलाने पुस्तक त्याच्या हातात दिले. पुस्तक देण्याची दोन कारणे होती, एक म्हणजे त्याला स्वत:ला‌च त्या पुस्तकाचे नाव उच्चारता येईल की नाही याची खात्री नव्हती, दुसरे म्हणजे त्या म्हाताऱ्याला वाचता येत नसेल तर तो स्वतःच शरमुन दुसऱ्या बाजूला जाईल. तो पुस्तक न्याहाळून बघत म्हणाला हे पुस्तक महत्त्वाचे आहे, पण थोडे त्रासदायक आहे. मुलाला धक्काच बसला म्हाताऱ्याला वाचता तर येत होतेच पण ते पुस्तक त्याने वाचलेलेही होते. आणि जर ते पुस्तक म्हाताऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे चांगले नसेल तर ते बदलून आणायला त्याच्याकडे वेळ होता. म्हातारा म्हणाला हे पुस्तक सांगते की माणसे स्वतःचे भविष्य निवडण्यात नेहमी असमर्थ ठरतात. अशी गोष्ट सांगते की जी खोटी आहे आणि लोकही या खोट्या गोष्टी वर विश्र्वास ठेवू लागतात. कोणती खोटी गोष्ट मुलाने विचारले. ते असे की आयुष्याच्या एका क्षणी आपण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी वर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि आपले आयुष्य नियतीच्या हातात जाते.g
पण माझ्याबाबतीत असे नाहीये. माझ्या घरातले मला प्रिस्ट होण्यास सांगत होते. मी मेंढपाळ होण्याचे ठरवले. वा ! छानचं. म्हणजे खरंच तुला प्रवासाची आवड आहे. मुलाला वाटले माझ्या मनात काय चाललेय ते म्हाताऱ्याला कळतंय. इकडे तो म्हातारा पुस्तकाची पाने अशी चाळत होता की तो पुस्तक ठेवूनच घेतोय असे वाटावे. मुलाच्या लक्षात आले की या माणसाचे कपडे वेगळे आहेत, तो अरबांसारखा दिसत होता आणि अरब लोक त्या भागात काही नवीन नव्हते. तरिफा पासून अफ्रिका काही तासांच्या अंतरावर होती.अरब लोक खरेदी विक्री करत शहरातून फिरताना दिसत असतं. त्याने विचारले तुम्ही कोठुन आलात?. " बऱ्याच ठिकाणांहून " म्हातारा म्हणाला. " असे कोणी बऱ्याच ठिकाणांहून येत नसते, मी मेंढपाळ असलेने खूप ठिकाणी फिरत असतो पण माझे गांव एकच आहे जिथं माझा जन्म झालाय. जुन्या किल्ल्याच्या जवळ आहे ते. " ठिक आहे मग माझा जन्म सालेम मध्ये झालाय." हे नाव त्याने ऐकले नव्हते पण एवढे नक्की होते की ते अंदालुसीया मधील नव्हते.
तुम्ही तिथे काय करता ?. त्याने विचारले.
" मी तिथे काय करतो ? " तो जोरात हसला व म्हणाला " मी सालेमचा राजा आहे."
माणसे काही वेळा ईतके विचित्र बोलतात ना !. त्यापेक्षा मेंढ्याबरोबर राहणे बरे , त्या बोलत तरी नाहीत, किंवा एकटेच पुस्तक‌ वाचलेले बरे. पुस्तकं पण अविश्वसनिय गोष्टी सांगतात पण आपण वाचले तरचं ना. माणसाशी बोलताना तो विचित्र बोलू लागला तर संभाषण कसे चालू ठेवावे कळतचं नाही.
माझे नाव मेल्विजेदक. राजा म्हणाला.
त्याने विचारले तुझ्याकडे किती मेंढ्या आहेत ?
" भरपूर आहेत" मुलाने उत्तर दिले. हा आता आपली माहिती काढतोय मुलाच्या मनात आले. म्हातारा म्हणाला, तुझ्याकडे भरपूर मेंढ्या आहेत असे तुला वाटत असेल तर प्रश्नचं आहे की मी तुला कशी मदत करणार. आता मुलगा वैतागला, तो काही मदत मागायला गेला नव्हता म्हाताऱ्यानेच वाईन मागण्याचे निमित्त काढून संभाषण सुरू केले होते.
'माझे पुस्तक द्या, मला मेढ्यांना घेऊन निघायचे आहे ' मुलगा म्हणाला. तुझ्या मेंढ्यांचा दहावा हिस्सा मला दिलास तर मी तुला खजिना कसा सापडेल ते सांगेन म्हातारा म्हणाला. मुलाला स्वप्न आठवले आणि त्याला वाटले की म्हातारीने फी घेतली नव्हती आणि हा म्हातारा कदाचित तिचा नवरा असेल आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही अशा गोष्टींची माहिती देण्यासाठी पैसे काढायला बघतोय. हा म्हातारा जिप्सीच असणार.