स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 15

  • 4.3k
  • 2.8k

" अहो मला काहीतरी बोलायचं होत...... म्हणजे विचारायचं होत." मिष्टी त्याच्याकडे बघत म्हणाली." बोला." विराज कॉफी एन्जॉय करत म्हणाला." ते मी ऑफिस परत जॉईन केलं तर चालेल का??.......म्हणजे ते दिवसभर घरात बसून कंटाळा येतो...... मीरा ही सकाळी गेली की दुपारीच येते.....वाटल तर मी ती यायच्या आधी घरी येइन......मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी लग्न तिला आई मिळावी म्हणून केलं आहे...... पण ऑफिस सांभाळून मी तिला ही सांभाळेन." मिष्टी भरभर बोलून गेली आणि उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे बघत राहिली.त्याने शांतपणे त्याच्या हातातला मग खाली ठेवला.. तिला जरा भितीच वाटत होती तो काय बोलेल?? तिच्यावर रागावणार तर नाही ना? परमिशन देतील कि नाही??? मला