गूढ रम्य

  • 2.2k
  • 840

गूढ-रम्य 1 तळहातावरच्या पितळीच्या बाळकृष्णाच्या मूर्तीकडे मी भान हरपून एकटक बघत होतो. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. माझी मतीच गुंग झाली होती. त्या मूर्तीच्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. तो लडिवाळ बाळकृष्ण माझ्याकडे बघून खट्याळपणे हासत असल्याचा भास होत होता. सुमारे पन्नास वर्षापूर्वी माझे बाबा ज्या मूर्तीला घरी ठेवून घर सोडून गेले होते. तीच- होय! तीच मूर्ती माझ्या तळहातावर होती. मी किरणपाणी खाडीच्या पाण्यात उभा होतो. सायंकाळच्या सोनेरी किरणांनी खाडीच पाणी चमचमत होतं. खाडीच्या मधोमध असलेल हिरवेगार बेट....त्या पलिकडचा गोव्याचा परिसर... छोटे...छोटे हिरवे डोंगर या साऱ्यांना सोनेरी सूर्यकिरणे न्हाऊ घालत होती. सारा आसमंत प्रसन्नपणे हसत होता. पण मी