घाबरट

  • 3.8k
  • 1
  • 1.5k

    मी सदाशिव रामेश्वर  कर्णिक , वय वर्ष चाळीस , मी विवाहित आहे आणि दोन मुलींचा बाप देखील ,खूप पैसेवाला जरी नसलो तरी पोटापुरत आणि कधीमधी मुलींची आणि बायकोची हौस पुरवण्या इतपत कमावतो , हि झाली माझी जुजबी ओळख, काय म्हणता काम काय करतो , काही विशेष नाही ओ एक सामान्य  सेल्समन आहे एका कपड्याच्या दुकानात , आणि हो माझ स्वतःच एक घर देखील आहे , वडिलोपार्जित असल तरी स्वतःच, भाड्याच नाही , तीच एक गोष्ट आहे जी मी नेहमी अभिमानाने सांगतो, हे सगळ मी तुम्हाला का सांगतोय ,  काही महिन्यांपूर्वी माझ आयुष्य हे अगदी सरळमार्गी होत  , पण