बुद्धिमान बायको - भाग २

  • 4.2k
  • 2.2k

बुद्धिमान बायको भाग  २ भाग १ वरुन पुढे वाचा  ........ “मी स्टोअर चं ट्रेनिंग घेणार आहे चार दिवस. मग बघा स्टोअर कसं अप टु डेट करतो ते.” – वैशाख. “अरे पण तुझं डिपार्टमेंट कोण सांभाळेल?” – साहेब. “चिंता करू नका साहेब, सगळे ट्रेंड आहेत. आणि मी आहेच अव्हेलेबल तशीच जरूर पडली तर. मी काही बाहेर गावी जात नाहीये.” – वैशाख. “ओके” – साहेब. “तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात? कुठे? आधी बोलला नाही?” – ललना. “ट्रेनिंगच घेणार आहे, पण घरीच. आणि तूच देणार आहेस.” – वैशाख. “शेवटी बायकोच सापडते ना चेष्टा करायला? नसेल सांगायचं तर नका सांगू.”-ललना “नाही नाही, तू समजते आहेस